दृष्टिबाधीत विद्यार्थ्यांसाठी करिअर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:58 IST2018-06-24T23:58:27+5:302018-06-24T23:58:48+5:30
महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयातील बारावी पदवी व पदवीत्तर उत्तीर्ण झालेल्या दृष्टिबाधीत मुला-मुलींसाठी करिअर अवरनेस कार्यशाळा नॅब संकुलात संपन्न झाली. हेल्प द ब्लाइन्ड फाउंडेशन चेन्नई आणि एनएबल इंडिया बंगळुरू या संस्थेच्या माध्यमातून दोनदिवसीय निवासी कार्यशाळा घेण्यात आली.

दृष्टिबाधीत विद्यार्थ्यांसाठी करिअर कार्यशाळा
नाशिक : महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयातील बारावी पदवी व पदवीत्तर उत्तीर्ण झालेल्या दृष्टिबाधीत मुला-मुलींसाठी करिअर अवरनेस कार्यशाळा नॅब संकुलात संपन्न झाली. हेल्प द ब्लाइन्ड फाउंडेशन चेन्नई आणि एनएबल इंडिया बंगळुरू या संस्थेच्या माध्यमातून दोनदिवसीय निवासी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे प्रतिनिधी विठ्ठल सावकार यांनी ही माहिती दिली. नॅब महाराष्टचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, श्याम पाडेकर, नवीनकुमार के, बबिता महाराणा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते बबिता महाराणा यांनी सांगितले की, यापुढे प्रत्येक व्यक्तीला तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच शिक्षण घ्यावे लागणार असून, यासाठी न्यूनगंड बाजूला सारून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात स्वत:ला वाहून घ्यावे. दोनदिवसीय कार्यशाळेत पुणे विद्यापीठाचे प्रा. धनंजय भोळे, डिजिटल प्रोग्रामिंगचे नवीनकुमार के,अभियंता बोनी दवे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. दृष्टिबाधितांसाठी करिअरच्या काय काय सुविधा आहेत, त्या कशा साध्य करता येथील, शैक्षणिक तंत्रज्ञान असलेल्या सामग्रीचा वापर शिक्षणासाठी कसा करता येईल, याची माहिती यावेळी देण्यात आली.