उपनगर येथे कार पेटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:24 AM2020-01-01T01:24:38+5:302020-01-01T01:25:23+5:30

उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

The car was set on fire in the suburb | उपनगर येथे कार पेटवली

उपनगर येथे कार पेटवली

Next

नाशिकरोड : उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपनगर अयोध्यानगर येथील दुर्गेश्वरी अपार्टमेंटमध्ये राहणारे व्यापारी गणेश शांताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मारु ती कारची पाठीमागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. सदर प्रकार रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. गाडीचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीत ऐवज लंपास
नाशिकरोड : के. जे. मेहता शाळेजवळील राजगृह बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. राजगृह बंगल्यात राहणारे विजय प्रभाकर कांबळे हे कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेले होते.
शनिवारी मध्यरात्री कांबळे कुटुंबीय घरी आले असता मुख्य दरवाजा उघडा व कडी-कोयंडा तुटलेला आढळला.
चोरट्याने दोन तोळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याचे कानातील झुमके, अंगठी, रोख
पंधरा हजार असा ७५ हजारांचा
ऐवज चोरून नेला. उपनगर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला आहे.

Web Title: The car was set on fire in the suburb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.