गुन्हे शाखा युनीट-१ : मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:57 PM2020-07-12T18:57:59+5:302020-07-12T18:58:41+5:30

यावेळी रामवाडीकडून मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार एक सफारी कार (एम.एच४३ एक्यू२७७२) संशयास्पदरित्या येथील पेट्रोलपंपाजवळून येताना दिसली. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने कारला थांबविले

In the car, the villagers were detained | गुन्हे शाखा युनीट-१ : मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext

नाशिक : गावठी पिस्तुल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयितांना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारच्या चालकाच्या अंगझडतीत जीवंत काडतुसासह पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी कारसह त्यास व त्याच्या तीघा साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी (दि.११) नेहमीप्रमाणे गुन्हे शाखा युनीट-१चे पथक गस्तीवर होते. यावेळी पोलीस नाईक विशाल काठे यांना एका एका सफारी कारमधून चौघे गावठी कट्ट्यासह हनुमानवाडी-जुना गंगापूरनाका रस्त्याने जाणार असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना याबाबत सुचित केले. वाघ यांनी तत्काळ चोपडा लॉन्सजवळच्या पूलालगत टी-पॉइंटवर सापळा रचला. यावेळी रामवाडीकडून मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार एक सफारी कार (एम.एच४३ एक्यू२७७२) संशयास्पदरित्या येथील पेट्रोलपंपाजवळून येताना दिसली. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने कारला थांबविले. यावेळी कारचालक तनिश कैलास गुप्ता (रा.कपालेश्वर मंदिराजवळ, पंचवटी) याची अंगझडती पोलिसांनी घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल व एक मॅगेझिनमध्ये जीवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रु पये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली ९ लाख रूपयांची सफारी क ार जप्त केली आहे. तसेच तनिशसह त्याच्यासोबत असलेले साथीदार मनाल खुशाल शिंदे (रा. वक्रतुंड अपार्टमेंट, म्हसरूळ), मोहन गणेश घुगे (रा. महाराष्टÑ कॉलनी, हिरावाडी, पंचवटी) या तीघांना अटक केली. त्यांच्याविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक बलराम पालकर, पोपट कारवाळ, हवालदार रवींद्र बागुल, संजय मुळक, नाझीम पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: In the car, the villagers were detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.