कारची दुचाकीला धडक, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:44 IST2021-03-11T21:38:33+5:302021-03-12T00:44:39+5:30
वणी : सापुतारा रस्त्यावरील माळे फाट्यावर कारने दुचाकीला धडक दिल्याने तिघे जखमी झाले असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारची दुचाकीला धडक, तिघे जखमी
वणी : सापुतारा रस्त्यावरील माळे फाट्यावर कारने दुचाकीला धडक दिल्याने तिघे जखमी झाले असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छगन गोपाळ पवार (२८) राहणार बोरचोंड, तालुका सुरगाणा हा (एमएच १५ एफएल ८०६२) या दुचाकीवरून विठ्ठल कृष्णा भोये व कृष्णा जाधव यांच्यासमवेत माळेदुमाला अहिवंतवाडी असे मार्गक्रमण करीत असताना सुरगाणा वणी रस्त्यावरून जाणाऱ्या कारने (क्रमांक एमएच ४१ एएम १४७७) भरधाव वेगात येत दुचाकीला धडक दिली. त्यात तिघे जण जखमी झाले. पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत.