गोदावरी नदीत कार कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:58 IST2020-06-21T22:42:33+5:302020-06-21T23:58:05+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

गोदावरी नदीत कार कोसळली
लासलगाव : निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. लासलगाव येथील मका खरेदी व्यापारी बापू होळकर हे कोपरगाव तालुक्यातील चास येथून लासलगाव येथे एमएच १५ जीएल ३००२ या क्रेटा कारने येत असताना कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाºयावरून समोरून आलेल्या वाहनाला वाट करून देत असताना कार बंधाºयात कोसळली. सुदैवाने सूर्यग्रहण असल्याने गोदावरी नदीवर स्नानासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत होळकर यांना पाण्यातून वर काढले. त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने लासलगाव येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.