द्वारका ते मुंबई नाका उड्डाणपुलाचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:43+5:302021-07-30T04:14:43+5:30

नाल्यातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त नाशिक : टाकळी तसेच श्री श्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने या ...

Capture of Dwarka to Mumbai Naka flyover | द्वारका ते मुंबई नाका उड्डाणपुलाचा कब्जा

द्वारका ते मुंबई नाका उड्डाणपुलाचा कब्जा

नाल्यातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त नाशिक : टाकळी तसेच श्री श्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्यांची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत असून दिवसभर येणऱ्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत.

बोगनवेल वाढीचा वाहतुकीला अडसर नाशिक : जिल्हा रुग्णालयामोरील नाशिक- त्र्यंबक रोडवरील दुभाजकावर बोगनवेल वाढल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. अनेकदा दुचाकीचालकांना बोगनवेल लागून दुखापत होत असल्याने बोगनवेलीची छाटणी करण्याची मागणी होत आहे.

बाजार समितीत वाढू लागली गर्दी

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्बंध नियमांचे प्रभाव कमी होत असल्याचे दिसते. लिलावाप्रसंगी बाजारात गर्दी वाढत आहे.

आवारात अनेक जण मास्कविना वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काटेकोरपणे मास्क सक्तीची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

बिटकोत वाढली ओपीडी रुग्णसंख्या

नाशिक : कोरोनाच्या प्रभावामुळे व्यस्त असलेल्या आरेाग्य यंत्रणेला आता दिलासा मिळाल्याने ओपीडी सुरू झाली आहे. त्यामुळे आता बिटको रुग्णालयातील ओपीडी वाढत असून रुग्णांना नियमित उपचार मिळू लागला आहे. ओपीडीसाठी नाशिक रोड परिसरातील अनेक ग्रामीण भागातून रुग्ण येतात.

Web Title: Capture of Dwarka to Mumbai Naka flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.