शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
2
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
3
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
4
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
5
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
6
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
7
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
10
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
11
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
12
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
13
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
14
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
15
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
16
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
19
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

छावणी परिषदेने चार हजार मतदारांची नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:27 IST

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी प्रशासनाने छावणी निवडणूक कायद्यानुसार दि.१ जुलै रोजी मतदारयाद्या जाहीर केल्या आहे. त्यात एकूण मतदारसंख्या ३१ हजार ०४३ असून, गतवर्षी ही संख्या ३५ हजार १०५ होती. त्यामुळे ४०६२ मतदारांची नावे न्यायालयाच्या आदेशान्वये वगळण्यात आली आहेत.

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी प्रशासनाने छावणी निवडणूक कायद्यानुसार दि.१ जुलै रोजी मतदारयाद्या जाहीर केल्या आहे. त्यात एकूण मतदारसंख्या ३१ हजार ०४३ असून, गतवर्षी ही संख्या ३५ हजार १०५ होती. त्यामुळे ४०६२ मतदारांची नावे न्यायालयाच्या आदेशान्वये वगळण्यात आली आहेत. छावणी परिषदेचा निवडणूक कायदा २००७ कलम १२नुसार प्रतिवर्षी महिन्यात घरोघरी मतदारांचे सर्वेक्षण करण्यात दि.१ जुलै रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येते. सदर यादीवर आक्षेप घेणे यासाठी २० दिवसांचा कालावधी जनतेला दिला जातो. तद्नंतर बोर्ड अध्यक्ष हे समिती गठीत करून यावर सुनावणी घेतात व त्यानंतर यादी प्रसिद्ध होते. दरम्यान, २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील सर्वच छावणी परिषदेने २०१७ पासून मतदारयादी बनविताना सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या तसेच बांधकाम आरखडा मंजूर न करता घरे बांधणाऱ्या नागरिकांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. देवळालीत मागील वर्षी ३५ हजार १०५ मतदार होते. यावर्षी ३१,०४३ झाली आहे. यात लष्करी भागातील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात मतदारयादी सर्वेक्षण सुरू होते त्यात घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. मात्र प्रशासनाने सरकारी जमिनीवर वास्तव्य असलेल्या नागरिकांची नावे वगळण्यात आली. परंतु वडिलोपार्जित घरे असून व ज्यांनी यापूर्वी निवडणुका लढविल्या आहे अशांची नावे कमी झाल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.-----------------लोकप्रतिनिधींनी घेतली अधिकाऱ्यांची भेटजाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार सर्वाधिक मतदार वॉर्ड क्र मांक ७ मध्ये कमी झाले आहे येथे गतवर्षी ४४९८ इतके मतदार होते यंदा मात्र १७९९ मतदार राहिले आहे. यामधून २६९९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. याचप्रमाणे वॉर्ड १,२,३ व ५ येथे देखील नावे कमी झाली आहे. वॉर्ड ४,६,८मध्ये मात्र काही प्रमाणात मतदारांची संख्या वाढली आहे.लोकप्रतिनिधीसह इच्छुक उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी अजयकुमार यांची भेट घेऊन वॉर्ड ७ मधील मतदारांच्या कमी करण्यात आलेल्या नावाबाबत विचारणा केली. यावर त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात आली आहे. यावर आपण कायद्यातील तरतुदीनुसार बोर्ड अध्यक्षांकडे दाद मागू शकतात.

टॅग्स :Nashikनाशिक