मालेगावी नागरिकांचा कॅण्डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:24 IST2020-02-24T23:19:08+5:302020-02-25T00:24:43+5:30

मालेगाव येथील माहेर असलेल्या विवाहिता लीना परदेशी हिचा टाकेद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज सायंकाळी संतप्त महिलांसह नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला.

Candlelight March for Malegavi Citizens | मालेगावी नागरिकांचा कॅण्डल मार्च

मालेगावी लीना परदेशी आत्महत्येप्रकरणी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी काढण्यात आलेला कॅण्डल मार्च.

ठळक मुद्देविवाहिता आत्महत्या : आरोपींना अटक करण्याची मागणी

मालेगाव : येथील माहेर असलेल्या विवाहिता लीना परदेशी हिचा टाकेद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज सायंकाळी संतप्त महिलांसह नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला.
श्रीरामनगरातील हुतात्मा स्मारकापासून मोर्चास प्रारंभ झाला. आबालवृद्धांनी हातात मेणबत्ती घेऊन शिवाजी जिमखान्यापासून श्रीरामनगरमार्गे मोर्चा काढला. मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी लीना परदेशी हिला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ललिता परदेशी, गीतेश बाविस्कर यांची भाषणे झाली. महिलांवर अत्याचार वाढत असून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चात रावसाहेब परदेशी, कार्तिक बच्छाव, आकाश परदेशी, राहूल पवार, प्रवीण देवरे, राहुल अहिरे, गौरव सावंत, गोरख सूर्यवंशी, मयूर देवरे, संदीप देवरे आदींसह मोठ्या संख्येन महिला व नागरिक सहभागी झाले होते. मयत लीना परदेशी हिचा सासरच्या लोकांकडून मारहाण करून व छळ होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी केवळ एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. उर्वरित तिघांनाही अटक करून लीना परदेशीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शासन करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोर्चेकºयांनी यावेळी केली.

Web Title: Candlelight March for Malegavi Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.