शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवार देणार मतदारांना ‘गोडवा’

By admin | Updated: January 12, 2017 00:56 IST

बचत गटांना रोजगार : तिळगूळ, लाडू, हलव्याची लाखो पाकिटे झाली भेट देण्यासाठी तयार

 नाशिक : येऊ घातलेली निवडणूक आणि मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मतदारराजाचे तोंड गोड करावे, या हेतूने शहरातील हजारो इच्छुक उमेदवारांनी बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे पॅकेट्स बनवून घेतले आहेत. त्यामुळे यंदा मतदारांना मधुमेह होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराच्या तिळगुळाचा आस्वाद घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे. शहरातील बचत गटांना मागील महिन्यातच तिळगुळाची मोठी आॅर्डर देण्यात आली असून, पंधरा दिवसांपासून बचत गटातील महिलांनी आॅर्डर पूर्ण करून इच्छुक मतदारांच्या घरी त्या पोहोचत्या केल्या आहेत. एकेका उमेदवाराने दहा हजार, पाच हजार तिळगुळाच्या पॅकेट्सची आॅर्डर दिली. त्या प्रत्येकी एका प्लॅस्टिक पाऊचमध्ये एक तिळगुळाचा लाडू, थोडा हलवा टाकून पाऊच बंद केल्यावर पाऊचला उमेदवाराचे ओळखपत्र व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे छोटेसे शुभेच्छापत्र स्टॅपल करण्यात आले आहे. शुभेच्छापत्रावर इच्छुक उमेदवाराचा फोटो, ओळख, आश्वासने व मतदान करण्याचे आवाहन, असा मजकूर आहे. या पाऊच व्यतिरिक्त काही उमेदवारांनी २५ ते ५० किलो तिळगुळाचे लाडू, हलवा यांच्या स्वतंत्र आॅर्डर्सही दिल्या आहेत. एकेका बचत गटात १२ ते १५ महिलांचा समावेश असून, बचत गटाच्या महिलांनी तिळगूळ, लाडू, हलव्याची लाखो पाकिटे पंधरा दिवसांत तयार केली आहेत. बचत गटांना मिळालेल्या या कामामुळे नोटाबंदीच्या अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बचत गटांना इतरही कामे मिळण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)