शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनी घेतला हात आखडता

By admin | Updated: February 26, 2017 00:11 IST

सातपूर : प्रचार रॅलीवर भर चौघांनीच केला दोन लाखांवर खर्च

सातपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या पंधरा दिवसांत जवळपास सर्वच उमेदवारांनी हायटेक प्रचार केला. मोठमोठ्या प्रचार फेऱ्या काढून शक्ती प्रदर्शन केले. मात्र या सर्व बाबींवर खर्च करण्यास फारच कंजुशी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सातपूर विभागातील एकूण १२६ मातब्बर उमेदवारांपैकी अवघ्या चार उमेदवारांचा खर्च दोन लाखांवर झाला आहे.महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागातील चार प्रभागात १६ जागांसाठी १२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराला निवडणूक कार्यालयात खर्च सादर करावा लागला आहे. प्रचाराच्या काळात जवळपास सर्वच उमेदवारांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली आहे. वाहनांना ध्वनिक्षेपक यंत्रणा लावून प्रचार केला. मोठमोठ्या प्रचार फेऱ्या काढल्या होत्या. प्रचारात कोणताही उमेदवार मागे राहिला नाही. मात्र खर्च करण्यात फारच कंजुषी केली आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावरून स्पष्ट होत आहे. मातब्बर आणि धनाढ्य उमेदवारांपेक्षा अन्य उमेदवारांचा खर्च अधिक झाला आहे.  ़़मतदानाच्या (दि.२१ पर्यंत) दिवसापर्यंत उमेदवारांनी सादर केलेला खर्च पाहता प्रभाग क्र .८ मध्ये शिवसेनेच्या नयना गांगुर्डे १ लाख २६ हजार ३५२ रु पये, अपक्ष माजी नगरसेवक उषा बेंडकोळी ९२ हजार ७१४ रु पये, भाजपाचे अशोक जाधव २ लाख २ हजार ८३६ रु पये, नगरसेवक शिवसेनेचे उमेदवार विलास शिंदे २ लाख ४९ हजार ९४८ रु पये, प्रभाग क्र .९ मध्ये नगरसेवक भाजपाचे दिनकर पाटील २ लाख ७९ हजार ७१३ रु पये, भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर १ लाख ६१ हजार ५८५ रु पये, भाजपाचे उमेदवार वर्षा भालेराव १ लाख ४५ हजार ८०९ रु पये, प्रभाग क्र .१० मध्ये मनसेच्या फरिदा शेख १ लाख २५ हजार ७२१ रु पये, भाजपाच्या पल्लवी पाटील १ लाख ६४ हजार रु पये, नगरसेवक शशिकांत जाधव १ लाख ३४ हजार ६१४ रु पये, शिवसेनेचे गोकूळ नागरे १ लाख २२ हजार ७१९ रु पये, प्रभाग क्र . ११ मधील शिवसेनेचे रूपाली गांगुर्डे ६४ हजार रु पये, मनसेचे योगेश शेवरे १ लाख ३३ हजार २७३ रु पये, विद्यमान नगरसेवक सलीम शेख यांचा खर्चदेखील दोन लाखांच्या आसपास झाला आहे. शिवसेनेचे दीपक मौले २ लाख ११ हजार ८६३ रु पये खर्च झाल्याचे त्यांनी सादर केलेल्या खर्चावरून स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)