निवड होऊनही उमेदवारांना नियुक्तीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:38 IST2020-08-27T22:05:34+5:302020-08-28T00:38:09+5:30
पंचवटी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरती अंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबरला ३२७ कनिष्ठ अभियंता जागांकरिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचा निकाल जानेवारी २०२० रोजी लागला आहे. सदर निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली आहे मात्र निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दयावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर भरती सोबत महाराष्ट्र राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई मेट्रो यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या त्या उमेदवारांना ऐन लॉकडाऊन असताना नियुक्ती दिली आहे. तरीही महावितरण कंपनीनेही अद्याप जाहिरातीच्या नियुक्ती संदर्भात कोणतीही परिपत्रक जारी केले नाही. वरील प्रकरणात लक्ष कडू यांनी लक्ष घालून ऊर्जा मंत्री नितीन राऊत व महावितरणकडे पुढील प्रक्रिया करण्याचे आणि निवड झालेल्या ३२७ उमेदवारांच्या नियुक्ती विषयी चौकशी करून न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मोतीलाल चव्हाण व प्रतिनिधी काशीद शेख उपस्थित होते.जाहिरातीची प्रकिया अंतिम टप्यात आहे. त्यानंतर ७ ते ८ महिने झाले तरी नियुक्ती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. महावितरण मध्ये नियुक्ती मिळेल या अपेक्षेने ऐन कोरोना सारख्या वैश्विक महामारी काळात अनेक उमेदवारांनी पूर्वीची नोकरी सोडली आहे त्यात अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने आर्थिक अडचण तसेच बेरोजगारीमुळे उमेदवार त्रस्त आहे.