शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

कॅनडा कॉर्नर सिग्नल नादुरुस्त; वाहनचालकांची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:59 PM

नाशिक : शहरातील शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी (दि.२३) सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन‌् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमाणेच वाहतुकीचेही संतुलन हरविल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले.

ठळक मुद्देवाहतूक विस्कळीत : अपघातांना मिळतेय निमंत्रण

नाशिक : शहरातील शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी (दि.२३) सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन‌् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमाणेच वाहतुकीचेही संतुलन हरविल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले.शहरातील सिग्नलव्यवस्थेवरील नियंत्रण आणि देखभालीची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून शहर पोलीस आयुक्तालयाकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र तत्पूर्वीच दुसरीकडे शहरातील सिग्नल यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सिग्नल यंत्रणा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील अत्यंत वर्दळीच्या चौकातील सिग्नलची अशी अवस्था मंगळवारी होती, यावरूुन अन्य सिग्नलचाही अंदाज सहज लावता येऊ शकतो. एकीकडे वाहनचालकांकडून सिग्नलचे पालन होत नसल्याची ओरड वाहतूक पोलिसांकडून होत असली तरी दुसरीकडे सिग्नल दुरुस्ती आणि नियंत्रणाविषयी मात्र मनपा व पोलीस प्रशासनाने काणाडोळा करणे पसंत केले आहे. त्याचप्रमाणे रेड क्रॉस चौकातील सिग्नलचेही काही दिवे नादुरुस्त झाले आहेत. रविवार कारंजाकडून नेहरू गार्डनकडे जाताना या मार्गावरील सिग्नल जेव्हा हिरवा होतो, तेव्हा दिवा प्रज्वलित होत नसल्याने नेमका सिग्नल चालू आहे, की बंद हेच वाहनचालकांना समजणे अवघड होत आहे. एकूणच शहरातील सिग्नलवरील दिवे तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पारिजातनगर येथील सिग्नल यंत्रणाही मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. पारिजातनगरचा सिग्नल कधी चालू तर कधी बंद अशी स्थिती असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच गंजमाळ सिग्लचेही काही दिवे बंद राहत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसून येतो. शहरातील सिग्नलला नेमका वाली कोण, असा सवाल संतप्त नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स