शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटाची खिचडी शिजेल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:06 IST

नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात

ठळक मुद्दे शासनानेच या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी ठेवल्यायोजनेची अंमलबजावणी करणा-या ठेकेदारांनी या योजनेचे वाटोळे केले.

श्याम बागुलअंगणवाड्यांतील बालके व शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी राबविल्या जात असलेल्या विद्यार्थी मध्यान्ह भोजन पुरविण्याच्या शासनाच्या योजनेचे आजवर तीन तेराच वाजत आले आहेत. परिणामी शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीत प्रत्येक वेळी बदल करून नवनवीन प्रयोग केले. अशा अनेक प्रयोगांतूनही नेहमीच या योजनेचे अपयश समोर आले. त्यात कधी कधी शासनानेच या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी ठेवल्या तर कधी कधी या योजनेची अंमलबजावणी करणाºया ठेकेदारांनी या योजनेचे वाटोळे केले. तरीदेखील दरवेळी नवीन प्रयोग करण्याचे थांबलेले नाही. नाशिक महापालिकेने महिला बचत गटांकडून मध्यान्ह भोजन योजना काढून ती सेंट्रल किचन असलेल्या खासगी ठेकेदारांना चालवायला दिली. महिना उलटत नाही तोच या योजनेचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील बालकांसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पोषण आहार पुरविणा-या ठेकेदाराच्या करामती पाहून सर्वोच्च न्यायालयाने आता महिला बचत गटामार्फत अंगणवाड्यांतील बालकांसाठी पोषण आहार देण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदेने पोषण आहाराच्या योजनेसाठी नवीन प्रयोग करण्याचे हातात घेतले असले तरी, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, नवीन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी व त्याची उपयोगिता सिद्ध व्हावी.

नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात असल्यामुळे ज्या कारणावरून महिला बचत गटांकडून मध्यान्ह भोजनाचा ठेका काढून घेण्यात आला. त्याचीच पुनरावृत्ती सेंट्रल किचन चालविणाºया ठेकेदाराने केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पुन्हा महिला बचत गटांनाच त्याचे काम देण्याचे घाटत आहे. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गतदेखील राज्यस्तरीय ठेकेदाराला दूर सारून महिला बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामागे शासनाकडून विद्यमान ठेकेदारांवर अविश्वास दर्शविण्यात आला असला तरी, महिला बचत गटांना पुन्हा ठेका देताना त्यासाठी ज्या काही अटी, शर्ती घालण्यात आल्या ते पाहता शासनाला खरोखर या योजनेतील त्रुटी दूर करून बालकांना पोषण आहार खाऊ घालायचा आहे काय असा प्रश्न निर्माण होतो. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवूनच या योजनेची अंमलबजावणी व नियमावली तयार करण्यात आल्याने त्यासाठी ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्नगटातील महिला बचत गटांना खरोखरच त्यासाठी पात्र ठरू शकतील याविषयी शंका उत्पन्न होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे महिला बचत गटांना अशा प्रकारचे ठेके देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा देखावा उभा करायचा व दुसरीकडे त्या पात्रच ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची अशी दुहेरी नीती शासनातील अधिकारी राबवित आहेत. अर्थातच त्यामागे त्यांचे ठेकेदारांशी असलेले साटेलोटे लपून राहिलेले नाही. अशाच साटेलोट्यातून या योजनांचे ठेकेदारांनी मातेरे केले म्हणून शासन नवनवीन प्रयोग करीत असून, आता महिला बचत गटांना ठेका देण्याचे घाटत आहे. मात्र योजना राबविणाºया शासकीय यंत्रणेची ठेकेदारधार्जिणी मानसिकता लक्षात घेता फार दिवस महिला बचत गटांची खिचडी ते शिजू देतील याची शाश्वती दिसत नाही.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका