देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूल रोडवरील कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने प्रवेश करून पाळीव कुत्र्याला ठार केले.बार्न्स स्कूल रोडवरील डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याने प्रवेश करून पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले. कुत्र्याच्या ओरडण्यामुळे कुलकर्णी कुटुंबीय जागे होताच बिबट्याने बंगल्याच्या आवारातून धूम ठोकली. त्यानंतर बंगल्याच्या आवारातील मातीवर बिबट्याच्या पायाचे ठसे कुलकर्णी कुटुंबीयांना आढळून आले. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. बार्न्स स्कूल रोड परिसरात जंगलसदृश परिस्थिती असल्याने नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असते. बंगल्याच्या आवारापर्यंत बिबट्या येऊनदेखील वनविभागाकडून अद्याप पिंजरा न लावण्यात आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कॅम्पला बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:18 IST