क्रेनखाली येऊन पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:41+5:302021-02-05T05:38:41+5:30
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चालकाने आपल्या ताब्यातील क्रेन (एमएच १५एचसी ०४०५) भरधाव चालवून पादचाऱ्यांना धडक दिली यात पादचारी क्रेनखाली ...

क्रेनखाली येऊन पादचारी ठार
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चालकाने आपल्या ताब्यातील क्रेन (एमएच १५एचसी ०४०५) भरधाव चालवून पादचाऱ्यांना धडक दिली यात पादचारी क्रेनखाली सापडून जागीच ठार झाला. शनिवारी (दि.३०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी अफजल फयाज खान (केळकर वाडी, सिन्नर फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित क्रेनचालक रवी दशरथ यादव (रा. इंदिरानगर, नाशिक) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाेलीस करीत आहेत.
---
लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक अत्याचार
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश मच्छिंद्र कडू (रा. तळोघ, ता. इगतपुरी) याने प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. २०१७ सालापासून २०२०पर्यंत पीडितेच्या घरी येऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. नंतर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संशयित गणेश याने आपली फसवणूक करत शारीरिक अत्याचार केल्याचे लक्षात येताच पीडित युवतीने म्हसरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेशविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
गळफास घेत तरुणाची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत एका युवकाने आत्महत्या केली. रोशन विष्णू गरड (२३, रा. आगर टाकळी, जोशी वाडा) असे गळफास घेणाऱ्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (दि. ३०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास रोशनने अज्ञात कारणातून राहत्या घरी हॉलमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. नातेवाइकांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
---