काळूस्तेत युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 14:25 IST2018-08-16T14:24:57+5:302018-08-16T14:25:19+5:30
घोटी : काळूस्ते ता इगतपुरी येथील एक तरु ण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काळूस्तेत युवकाची आत्महत्या
घोटी : काळूस्ते ता इगतपुरी येथील एक तरु ण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळूस्ते ता.इगतपुरी येथील अरविंद किसन जागले (२५) हा एकटाच घरी असताना कोणीच नसल्याची संधी साधत घरासमारोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे आईवडील गावी गेले होते. दरम्यान या युवकाचे घरातच काहीतरी किरकोळ भांडण झाल्याचे सांगण्यात आले परंतु एकट्यापणाचा फायदा घेऊन घराबाहेर असलेले भेंडीच्या झाडाला फास अटकवून आत्महत्या केलीे. हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी धाव घेऊन ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर घारे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फोन करु न अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. मृत्यूचे कारण अद्यापही कळाले नाही . आकस्मित मृत्यूची नोंद इगतपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास इगतपुरीचे पोलीस हवालदार श्री बोराडे व महिरे करत आहेत.