केरळ पूरग्रस्तांसाठी कळवणकरांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:22 IST2018-09-07T18:21:25+5:302018-09-07T18:22:37+5:30
केरळ येथील पूरग्रस्तासाठी दि कळवण मर्चट को आॅप बॅकेच्या वतीने एकाहत्तर हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.

केरळ पूरग्रस्तांसाठी कळवणकरांचा मदतीचा हात
कळवण : केरळ येथील पूरग्रस्तासाठी दि कळवण मर्चट को आॅप बॅकेच्या वतीने एकाहत्तर हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.कमको बॅकेने सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे यांच्याकडे केरळ पूरग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी७१ हजार रु पयांची मदत देण्यात आल्याची माहिती कमकोचे अध्यक्ष प्रवीण संचेती यांनी दिली.
केरळ येथील पूरग्रस्तासाठी श्री गजानन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कळवण या संस्थेच्या वतीने अकरा हजाराची आर्थिक मदत देण्यात आली असून कळवण शहर व तालुक्यातून सहकारी संस्था व संघटना यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु आहे. श्री गजानन पतसंस्थेने सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे यांच्याकडे केरळ पूरग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११हजार रु पयांची मदत देण्यात आल्याची माहिती गजानन अध्यक्ष राजेंद्र सोनजे यांनी दिली.
केरळ पूरग्रस्तांसाठी कमकोकडून मदत