बिबट्याचा हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:15 IST2020-08-29T23:34:04+5:302020-08-30T01:15:49+5:30
नाशिक : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करत फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

बिबट्याचा हल्ल्यात वासरू ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करत फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.
येथील शेतकरी मोतीराम मुकुंदराव गडाख यांचे गावालगत घर असून, घराजवळच जनावरे बांधलेली होती. नुकतेच जन्म झालेले एक दिवसाचे वासरू गायीजवळ बांधलेले होते. सकाळी वासराचा जन्म झाला व त्याच रात्री बिबट्याने ते फस्त केले. रात्री मोतीराम गडाख बाहेर झोपलेले असताना हा प्रकार घडला. सुरुवातीस वासरू गायीजवळ नसल्याने गडाख गोंधळले. परंतु नंतर बिबट्याने वासरू खाल्ल्याचा संशय आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वासरास पूर्ण फस्त केलेले असल्याने बिबट्याचं असल्याचा निर्वाळा दिला.