विंचूरदळवीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:49 IST2018-06-09T23:49:25+5:302018-06-09T23:49:25+5:30

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी परिसरात बिबट्याने शुक्रवारी (दि. ८) पहाटे येथील शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले.

The calf killed in a leopard attack | विंचूरदळवीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

विंचूरदळवीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

ठळक मुद्दे बिबट्याने अचानक वासरावर हल्ला करून त्यास ठार केले.

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी परिसरात बिबट्याने शुक्रवारी (दि. ८) पहाटे येथील शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले. येथील दळवी वस्तीवर दळवी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात गाय व वासरू बांधून घरात झोपले होते. शुक्रवारी पहाटे ३.३०च्या सुमारास बिबट्याने अचानक वासरावर हल्ला करून त्यास ठार केले. वासराच्या गळ्यातील दोर न तुटल्याने त्याने वासरूला फस्त करून वस्ती शेजारी असलेल्या शेतात पलायन केले. पहाटेच्या सुमारास दळवी चारा टाकण्यासाठी गेले असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: The calf killed in a leopard attack

टॅग्स :Nashikनाशिक