सुकेणेला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:08 IST2019-12-13T01:06:54+5:302019-12-13T01:08:08+5:30

मौजे सुकेणे शिवारात गुरुवारी सकाळी जगन्नाथ सोनवणी यांच्या शेतातील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. गेल्या आठवड्यापासून मौजे सुकेणे शिवारात बिबट्याचा वावर आहे

Calf killed in calf attack | सुकेणेला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

सुकेणेला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

कसबे-सुकेणे : मौजे सुकेणे शिवारात गुरुवारी सकाळी जगन्नाथ सोनवणी यांच्या शेतातील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले.
गेल्या आठवड्यापासून मौजे सुकेणे शिवारात बिबट्याचा वावर आहे. औरंगाबाद-नाशिक राज्यमार्ग, गोंडेगाव-सुकेणे-चांदोरी शिवार, सोनवणे वस्ती, हांडोरे वस्ती या भागात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. ठिकठिकाणी त्याच्या पायाच्या खुणा आढळून आल्याने बिबट्याची दहशत आहे. गुरुवारी सकाळी जगन्नाथ सोनवणी यांच्या शेतातील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. या घटनेमुळे मौजे सुकेणे शिवारात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान येवला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Calf killed in calf attack