बछड्याने केला वासरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 01:18 IST2019-11-10T01:17:46+5:302019-11-10T01:18:38+5:30
बेलतगव्हाण गावात बछड्याने वासरावर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वासराचे प्राण वाचले.

बछड्याने केला वासरावर हल्ला
देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या बेलतगव्हाण गावात बछड्याने वासरावर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वासराचे प्राण वाचले. तीन आठवड्यांपासून बेलतगव्हाण शिवारात बिट्याचा संचार सुरु होता. अनेक नागरिकांना सदर बिबट्या वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनास आला होता. आठ दिवसांपूर्वी महिला शेतात काम करीत असताना त्यांनाही तो दिसून आला होता. त्यावेळी महिलांनी आरडाओरड करून व फटाके फोडून त्यास पळवून लावले होते. त्यानंतर शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बेलतगव्हाण गावात संजय परशराम कुटे यांच्या वासरावर बिबट्याच्या बछड्यावर हल्ला केला. नागरिकांच्या सावधगिरीमुळे वासराचे प्राण वाचले. सदर घटना घडल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर तांबे यांनी पोलीस तसेच वन अधिकारी गोसावी यांना तातडीने माहिती देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.