नाशिक : मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजूरांनी वनविभागनाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे.औरंगाबाद महामार्गालत असलेल्या मौजे मानूर गावाच्या शिवारात छत्रपती शिवाजीनगर कॉलनीतील वस्तीलगत मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास बिबट्याने काही शेतमजूरांसह ऊसतोड कामगारांना दर्शन दिले. दरम्यान, सकाळी येथील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत पिंजरा लावण्याची मागणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्याशी चर्चा करत तत्काळ वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांना पिंजरा लावण्याचे आदेश दिले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वस्तीलगत असलेल्या ऊसशेतीच्या बांधाला पिंजरा तैनात करण्यात आला.
पिंजरा तैनात : मौजे मानूरच्या ऊसशेतीजवळ बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 16:54 IST
ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे.
पिंजरा तैनात : मौजे मानूरच्या ऊसशेतीजवळ बिबट्याचे दर्शन
ठळक मुद्देबिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता सुर्योेदय झाल्यानंतरच ऊसशेतीच्या जवळ जावेपहाटेदेखील ऊसशेतीच्या आजूबाजूला फिरकू नयेऊसशेतीच्या बांधाला पिंजरा तैनात