शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नैसर्गिक जैवविविधतेविषयी जागृतीला नांदूरमधमेश्वरच्या ‘बर्ड फेस्टीव्हल’ने दिला ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:18 IST

या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.

ठळक मुद्देविविध जातींचे पक्षी, त्यांचे प्रकार, सौंदर्य, वैशिष्ट्य आणि महत्त्व याविषयी मंथन नाशिकपासून हे अभयारण्य अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर नाशिक वन्यजीव विभागाने प्रथमच ‘बर्ड फेस्टिव्हल’ भरविले होते

नाशिक : निसर्गाचा खरा दागिना म्हणून पक्षी ओळखले जातात. पक्ष्यांचे महत्त्व ग्रामिण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या काव्यातून अधोरेखित करत माणसाला ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस’ असा उपरोधिक प्रश्नही विचारला आहे. दिवसेंदिवस वाढणाºया सिमेंट कॉँक्रीटच्या जंगलात पक्षी-प्राण्यांची घुसमट होऊ लागली आहे. पक्ष्यांविषयीची जनजागृती होणे आणि भावीपिढीचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने नाशिक वन्यजीव विभागाने प्रथमच ‘बर्ड फेस्टिव्हल’ भरविले होते. या फेस्टिव्हलने नैसर्गिक जैवविविधतेच्या जागृती अभियानाला एकप्रकारे बूस्ट दिला. विविध पक्षी प्रेमींची मांदियाळी यावेळी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पहावयास मिळाली.

विविध जातींचे पक्षी, त्यांचे प्रकार, सौंदर्य, वैशिष्ट्य आणि नैसर्गिक जैवविविधतेमधील त्यांचे महत्त्व याविषयीचे मंथन घडावे, जेणेकरुन पक्ष्यांबाबत होणारे समाजाचे दुर्लक्ष कमी होण्यास मदत होईल. या उद्देशाने नुकतेच तीन दिवसीय फेस्टिव्हल घेतले गेले. या फेस्टिव्हलमध्ये मान्यवरांनी पक्षी व त्यांचे निरिक्षण, महत्त्व याविषयी परिसंवादातून चर्चा घडवून आणली.या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.केवळ परिसंवाद, चर्चासत्रांपुरते हे फेस्टिव्हल मर्यादित नव्हते तर अभ्यासकांच्या साथीने पक्षी निरिक्षण वॉक, चित्रकला, छायाचित्र स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.यावेळी वनविभाग वन्यजीवच्या वतीने पक्ष्यांविषयीच्या माहितीपुस्तिकांचेही वाटप करण्यात आले. वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी पुढाकार घेऊन हे बर्ड फेस्टिव्हल यशस्वी केले.

निफाड तालुक्यातील चापडगाव येथे कादवा नदीवरील नांदूरमधमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरभोवती पक्षी अभयारण्य विकसीत केले गेले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा असलेल्या या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यावर वन्यजीव विभागाचे विशेष नियंत्रण आहे. नाशिकपासून हे अभयारण्य अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर आहे. विविध देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी हे अभयारण्य प्रसिध्द आहे. दरवर्षी या अभयारण्यात हिवाळ्यामध्ये पक्ष्यांचा कुं भमेळा भरलेला पहावयास मिळतो.

टॅग्स :Nashikनाशिकnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग