शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

मोदींच्या सभेसाठी बसेस; पहाटेपासून प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:20 AM

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेसाठी गावागावातून बसेस शिर्डीकडे पाठविण्यात आल्याने जिल्हाभरातील प्रवाशांची गैरसोय झाली, तर ...

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेसाठी गावागावातून बसेस शिर्डीकडे पाठविण्यात आल्याने जिल्हाभरातील प्रवाशांची गैरसोय झाली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेस न मिळाल्याने त्यांची शाळादेखील बुडाली. शुक्रवारी पहाटेपासूनच प्रवासी बसस्थानके आणि बसथांब्यावर अडकून पडले होते.  बसेस का बंद करण्यात आल्या याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने दिवसभर गोंधळाची परिस्थिती कामय होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याने या कार्यक्रमासाठी गावागावातील नागरिकांना शिर्डीत घेऊन येण्याचे फर्मान असल्याने प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली. जिल्ह्यातून सुमारे २० हजार नागरिकांना शासकीय खर्चातून शिर्डीत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातून ३१० बसेस राखून ठेवल्या होत्या. या सर्व बसेस शुक्रवारी पहाटेपासून गावागावात पोहचल्या आणि शिर्डीकडे रवानादेखील झाल्या. त्यामुळे एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.सकाळपासूनच बसेस नसल्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणाºया नोकरदार आणि कामगारांची मोठी गैरसोय झाली. शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी बसस्थानकात पोहचले मात्र बसेसच नसल्यामुळे त्यांना माघारी फिरकावे लागले. पहाटेपासून जिल्ह्यातील गावागावांमधून बसेस भरून शिर्डीकडे पाठविण्यात आल्यामुळे दिवसभरात ग्रामीण भागात दैनंदिन कामकाज करणाºयांची बसेसअभावी मोठी अडचण निर्माण झाली. शिर्डीतील मोदी यांच्या सभेसाठी घरकुल योजनांचा लाभ झालेले आणि प्रस्तावित लाभार्थ्यांबरोबरच ज्या गावात आणखी आवास योजना राबविण्यात येणार आहेत अशा सर्व गावांमधून जास्तीत जास्त नागरिकांना शिर्डीत घेऊन जाण्याचे नियोजन होते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. त्यानुसार जिल्हापातळीवर नियोजन करून अधिकाºयांकडे गावाची जबाबदारी देण्यात आली होती. जास्तीत जास्त नागरिकांनी सभेसाठी उपस्थित रहावे यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी गेल्या आठवडा भरापासून जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.शिर्डी येथील मोदींच्या सभेसाठी जिल्ह्याभरातील १३ डेपोंमधून ३०१ बसेस पाठविण्यात आलेल्या आहेत. यातील बहुतेक बसेस या सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी नियोजित केलेल्या जादा बसेस आहेत. याबसेस धुळे आणि पुणे डेपोंमधून मागविण्यात आलेल्या होत्या. याच बसेस शिर्डीसाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. मार्गावर बसेस नाहीतच असे नाही. साधारणपणे चार वाजेपर्यंत सर्व बसेस नाशिकला येतील त्यानंतर सेवा सुरळीत सुरू होऊ शकेल.- अरुण सिया, वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळपूर्वसूचना न देताच बसेस बंदकोणतीही पूर्वसूचना नसताना बसेस बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. बस नेमकी कधी येणार किंवा बसेस का बंद आहेत याची कोणतीही माहिती नियंत्रण कक्षाकडूनदेखील दिली जात नव्हती. त्यामुळे महाविद्यालयात जाता आले नाहीच. अनेक विद्यार्थी माघारी फिरले. कामानिमित्ताने नाशिकला जाणाºयांचेदेखील हाल झाले. नियमित रस्त्यावर धावणाºया बसेसदेखील नसल्याने काय झाले हे काहीच कळत नव्हते.- समाधान वाणी, ओझरप्रवाशांना गृहित धरणार का?मोदी यांच्या सभेसाठी जिल्ह्यातून बसेस पाठविण्यात आल्यामुळे दैनंदिन प्रवास करणाºया ग्रामस्थांचे हाल झाले. बसेस पाठविण्यात येणार नसल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना महामंडळाकडून देण्यात आली नाहीच. शिवाय महामंडळाने पर्यायी व्यवस्थादेखील केली नसल्यामुळे प्रवाशांच्या समस्येत अधिकच भर पडली. विशेषत: शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली. स्थानकांवरदेखील प्रवासी अडकून पडले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर बसेस अधिगृहित केल्यामुळे याबसेस रस्त्यांवरून कमी होतील. याची जाणीव असूनही महामंडळाकडून मात्र कोणतेही नियोजन करण्यात आले नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळNarendra Modiनरेंद्र मोदी