बसचालकास बेदम मारहाण
By Admin | Updated: January 29, 2017 00:26 IST2017-01-29T00:26:19+5:302017-01-29T00:26:37+5:30
बसचालकास बेदम मारहाण

बसचालकास बेदम मारहाण
नाशिक : चुकीच्या पद्धतीने गाडी चालवित असल्याची कुरापत काढून शहर बसचालकास कारमधील चौघा संशयितांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्री घडली़ बसचालक रमेश झाडे (४०, रा़ चिंचोली, ता़ सिन्नर, जि़ नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकरा वाजेच्या सुमारास ते सीबीएसकडून नाशिकरोडला प्रवासी बस (एमएच १५, एके ८०५३) घेऊन जात होते़ यावेळी शालिमार येथील देवी मंदिरासमोरून जात असताना सफेद रंगाच्या फोर्ड फिगो कारमधून (एमएच १५, डीएस ९३१०)आलेल्या चौघा संशयितांनी बस अडवली़ यानंतर या चौघांनी खाली उतरून कशा प्रकारे गाडी चालवतो, अशी विचारणा करीत शिवीगाळ करून मारहाण केली व फरार झाले़ याप्रकरणी बसचालक झाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)