शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील बस स्थानके झाली चोरट्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:55 IST

जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

ठळक मुद्देएसटीच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मध्यवर्ती बसस्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट

नाशिक : शहरातील जुने, नवे मध्यवर्ती बस स्थानक चोरट्यांचा अड्डा बनले असून शुक्रवारी एकाच दिवशी दोन्ही बसस्थांब्यांवर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या खांद्यावरील बॅगेतून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐेवड चोरट्यांनी चोरून नेला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त परिसरात राहणारे जया पांडुरंग काळे (६१) जुने सीबीएस येथे एसटीमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खाद्याला लावलेल्या बॅगेतील ५७ ग्रॅम वजनाची काळेमणी व सोन्याची पट्टी व सोन्याची पळी असलेली सोन्याची पोत असा १ लाख ७१ हजार रुपये किमतीचे दागिने व २७ ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टी, सोन्याचे पेंडल असलेली सोन्याची पोत असा ८१ हजार रुपयांचा मिळून सुमारे २ लाख ५२ हजार रपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी जया काळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अशाच प्रकारची चोरीची घटना ठक्कर बाजार येथेही घडली आहे. या घटनेत पुणे येथील ज्योती भारत महाजन नाशिक-पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन ज्योती महाजन यांच्या खांद्याला लावलेल्या बॅगमधून सुमारे ६ हजार सहाशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यात पर्ससह मोबाइल आणि रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार निक म या प्रकरणाचा तपास करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकThiefचोरWomenमहिलाPoliceपोलिस