शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

बससेवेचा मुहूर्त हुकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:44 PM

नाशिक : महापालिकेच्या वतीने येत्या १ मेपासून शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू असून, यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसे सांगण्यात आले असले तरी त्यासाठी तयारी अपूर्ण असून, पूर्ण क्षमतेने बसदेखील दाखल झालेल्या नाहीत. अन्य अनेक सेवांची कामे अपूर्ण असल्याने बससेवेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तसे सूतोवाच केले आहे.

ठळक मुद्दे मनपा आयुक्तांचे सूतोवाच : तयारी अपूर्णच, अन्य समस्याही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या वतीने येत्या १ मेपासून शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू असून, यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसे सांगण्यात आले असले तरी त्यासाठी तयारी अपूर्ण असून, पूर्ण क्षमतेने बसदेखील दाखल झालेल्या नाहीत. अन्य अनेक सेवांची कामे अपूर्ण असल्याने बससेवेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तसे सूतोवाच केले आहे.महापालिकेने शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला. मात्र, त्यावेळी महासभेत परिवहन समितीमार्फत या सेवेचे संचलन करण्याचा ठराव करण्यात आला. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून बस कंपनीचा ठराव करण्यास भाग पाडले. पहिल्या टप्प्यात चारशे बस घेताना त्यात सीएनजी आणि डिझेल बस होत्या. मात्र, फडणवीस यांनी त्यावर काट मारून डिझेलच्या बस कमी करून इलेक्ट्रीक बस वापरण्याची सूचना केली. त्यातच बससेवा पुरवठ्यासाठी निविदा मागवल्यानंतर त्याला सुरुवातीच्या काळात प्रतिसादच मिळाला नाही. इलेक्ट्रीक बससाठी तर तीन वेळा निविदा काढूनदेखील एकमेव निविदा आल्याने त्याच कंपनीला काम देण्यात आले. वाहक आणि अन्य कर्मचारी, तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुविधा, बसस्थानके आणि अन्य अनेक कामे होणे बाकी आहे. अनेक जागा राज्य परिवहन महामंडळाशी करार करून ताब्यात घेण्यात येणार असून, त्याबाबतदेखील कार्यवाही होणे बाकी आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात बाकी आहे. सीएनजी बस दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.शहरातील काही मोजक्याच मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तथापि, सर्वच कामे सध्या कार्यवाहीत असून, अवघ्या दीड महिन्यात ही कामे पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने बससेवा वेळेत सुरू होण्याची शक्यता नाही. आयुक्त गमे यांनीदेखील बससेवा मेपासून सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.महापालिकेच्या सेवेसाठी इलेक्ट्रीक बस वापरण्यात येणार आहे. परंतु फक्त ५० बसेससाठीच केंद्र शासनाचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळेदेखील अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालक