नाशिकहून नागपूरसाठी बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:50 IST2020-09-14T00:50:10+5:302020-09-14T00:50:37+5:30
मिशन बिगेनअंतर्गत जिल्हा बससेवा सुरू केल्या आहेत. आता त्या पुढे जाऊन सोमवारपासून (दि.१४) नाशिक ते नागपूर ही साधी शयन यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

नाशिकहून नागपूरसाठी बससेवा
नाशिक : मिशन बिगेनअंतर्गत जिल्हा बससेवा सुरू केल्या आहेत. आता त्या पुढे जाऊन सोमवारपासून (दि.१४) नाशिक ते नागपूर ही साधी शयन यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
नाशिकमधून रात्री ८ वाजता, तर मालेगाव येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी ही सेवा सुरू होणार आहे. उद्यापासूनच नाशिकहून सोलापूरसाठी सकाळी साडेनऊ आणि रात्री आठ वाजता, अकोल्यासाठी सकाळी साडेआठ वाजता, लोणारसाठी सकाळी साडेसात वाजता, नादंगाव येथून परळी वैजनाथसाठी सकाळी ९.१५ वाजता बससेवा सुरू होणार आहे.