शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खोल दरीत कोसळली बस, 3 प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 13:15 IST

बोरगाव कनाशी मार्गावरील गायदरी घाटात बुधवारी (2 मे) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल बस भीषण अपघात झाला.

नाशिक - बोरगाव कनाशी मार्गावरील गायदरी घाटात बुधवारी (2 मे) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल बस भीषण अपघात झाला. कळवण (नाशिक) सापुतारापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गायदरी घाटात ही बस कोसळली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 2 महिला आणि एका 8 वर्षांच्या मुलीचा समावेश असून त्यांची ओळख अद्यापपर्यंत समजू शकलेली नाही. तर जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमधील प्रवासी हे गुजरातमधील नवसारी आणि सुरतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. वणी येथील सप्तश्रृंगीगडावरील देवीच्या दर्शनासाठी ते सुरतहून महाराष्ट्रात येत असतानाच हा अपघात घडला.

दरम्यान, जखमींवर महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या बोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जखमींना आहवा- डांग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात