भरधाव बसची कारला धडक
By Admin | Updated: July 5, 2017 00:12 IST2017-07-05T00:12:14+5:302017-07-05T00:12:28+5:30
नाशिक : बसने कारला धडक दिल्याची घटना तारवालानगर चौफुलीवर घडली़

भरधाव बसची कारला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भरधाव शहर वाहतूक बसने कारला धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३०) दुपारच्या सुमारास तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी मार्केट यार्डकडून फोर्ड इको स्पोर्ट कारचालक (एमएच १५, एफजी ३३६६) सचिन अरविंद दराडे (३४, रा़ नगर चौकी रोड, दराडे मळा, मनमाड) हे अमृतधामकडे जात होते़ त्यावेळी तारवाला चौफृलीवर म्हसरूळकडून निमाणीकडे जाणाऱ्या शहर बसचालकाने (एमएच २०, बीएल ४१८६) कारला धडक दिली़ यामध्ये कारचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कारचालक दराडे यांच्या फिर्यादीनुसार बसचालका विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़