आगीत जळून एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:52 IST2018-11-14T14:51:39+5:302018-11-14T14:52:04+5:30
गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथील घरास आग लागली.

आगीत जळून एका महिलेचा मृत्यू
नाशिक : गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथील घरास आग लागली. या आगीत सुनीता जटाळे वय अंदाजे 27 ही आगीत जळाल्याने मृत्य पावली आहे. सुनीता ही काल रात्रीच आपल्या आत्याच्या (भागूबाई आव्हाड) घरी आली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी आधिक तपास करीत आहे. दुपारी एक वाजेदरम्यान लागलेल्या या आगीमुळे शेजारील तीन घरे देखील जळाली आहेत. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतिचे वातावरण पसरले होते. जागरूक तरुणांनी वेळीच आगीची माहिती अग्निशमन दलाला व पोलिसांना दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या साह्याने साधारणतः दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.