शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूनगर वसाहतीत वाहन जळीतकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:17 IST

नेहरूनगर येथील सीआयएसएफ वसाहतीत अज्ञात समाजकंटकाने सीआयएसएफच्या दोन जवानांच्या दुचाकी सोमवारी पहाटे पेटवून दिल्याने त्या आगीत जळून खाक झाल्या.

नाशिकरोड : नेहरूनगर येथील सीआयएसएफ वसाहतीत अज्ञात समाजकंटकाने सीआयएसएफच्या दोन जवानांच्या दुचाकी सोमवारी पहाटे पेटवून दिल्याने त्या आगीत जळून खाक झाल्या. सीआयएसएफ वसाहतीत गेल्या काही महिन्यांत तिसऱ्यांदा वाहन जळीतकांडाची घटना घडल्याने सीआयएसएफ वसाहतीच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नेहरूनगर सीआयएएफ वसाहतीतील टाइप -२ ए क्वार्टरमध्ये जवान संदीप विश्रांत पानवळ (३९) व मंगल आनंदराव पाटील हे राहण्यास असून, त्यांच्या दुचाकी इमारतीखाली नेहमीप्रमाणे लावल्या होत्या. सोमवारी (११ मार्च) पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने पानवड यांची ड्रीम युगा (एमएच ५० जी ०४८५) व पाटील यांची होंडा शाईन (सीजी ०७ एलडब्ल्यू ०१८९) या दोन्ही दुचाकीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्या. काही वेळातच आजूबाजूच्या रहिवाशांना दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत दोन्ही गाड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या.वाहन जळीताची तिसरी घटनानेहरूनगर सीआयएसएफच्या नियंत्रण कक्ष मोटार परिवहन विभागात गेल्या १२ आॅक्टोबर २०१८ रोजी अचानक लागलेल्या आगीत सीआयएसएफच्या क्वॉलिस व मार्शल जीपचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या २ जानेवारी २०१९ रोजी पहाटे सीआयएसएफच्या वसाहतीत दोन-तीन ठिकाणी नऊ दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्या पेटवून देण्यात आल्या होत्या. या दोन्ही घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही.दुचाकीला लागलेल्या आगीच्या ज्वालांमुळे इमारतीच्या तळ मजल्यावरील वीजमीटरदेखील जळाले आहेत. याबाबत सीआयएसएफ जवान संदीप पानवळ यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Fairजत्राNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी