कारसूळला ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:14 IST2018-11-20T18:14:03+5:302018-11-20T18:14:33+5:30
कारसूळ गावात शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या भीषण आगीत सुमारे साडेचार लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.

कारसूळला ऊस जळून खाक
पिंपळगाव बसवंत : कारसूळ गावात शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या भीषण आगीत सुमारे साडेचार लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. शेतकरी रामकृष्ण रामचंद्र ताकाटे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. कारसूळ शिवारातील गट नंबर ४०५ मधील १ हेक्टर ५० आर क्षेत्रास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग विझविण्यासाठी तातडीने पिंपळगाव अग्निशामक दलास पाचारण करण्यात आल्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.