पुण्यातील भाजलेल्या विवाहितेचा येवल्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:25+5:302021-09-18T04:16:25+5:30
नंदुरबार येथील आशिष वळवी हे पुणे येथे शिक्षक असून, नोकरीनिमित्त सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली येथील नारायणनगर येथे ...

पुण्यातील भाजलेल्या विवाहितेचा येवल्यात मृत्यू
नंदुरबार येथील आशिष वळवी हे पुणे येथे शिक्षक असून, नोकरीनिमित्त सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली येथील नारायणनगर येथे पत्नी निशा आशिष वळवी आणि मुलांसोबत राहतात. गुरुवारी (दि. १६) संध्याकाळी निशा स्वयंपाक करत असताना अंगावर तेल पडल्याने अचानक लागलेल्या आगीत भाजली. तिला उपचारासाठी नंदुरबार येथे खासगी वाहनाने घेऊन जात असताना येवल्यादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.
वाहनचालकाने मृत निशा हीस येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून निशा हीस मयत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपासासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर पोलीस ठाण्यात सदर गुन्हा वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
येवला पोलिसांनी मयत निशाच्या पतीला पुणे येथे मोठमोठे खासगी रुग्णालय असताना आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबार येथे उपचाराला का घेऊन जात होते, असा प्रश्न विचारला असता यावर मयत निशाच्या पतीला समाधानकारक उत्तर न देता आल्याने निशाच्या मृत्यूबाबत पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे.