शाळेतील आठवणींना उजाळा
By Admin | Updated: February 4, 2016 23:26 IST2016-02-04T23:25:23+5:302016-02-04T23:26:53+5:30
देवळा पब्लिक स्कूल : गुरुजनांविषयी व्यक्त केली कृतज्ञता

शाळेतील आठवणींना उजाळा
नाशिक : शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत देवळा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी पुन्हा एकदा भूतकाळात रमले. यानिमित्ताने चाळीस वर्षांतील विविध बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा २०१८ मध्ये होणारा सुवर्णमहोत्सव थाटात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश देणाऱ्या देवळा पब्लिक स्कूलमधील चाळीस वर्षांतील म्हणजेच १९७५ ते २०१५ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी एक व्हायचे ठरविले आणि नाशिकमध्ये हा मेळावा नुकताच संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळेच्या माजी आणि ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यात सरोदे, इ. के. मेतकर, डी. डी. अहेर, डी. बी. पवार, पी. डी. उशीर, आर. पी. नेरे, एस. एस. देवरे, तुषार धोंडगे, नाठे यांचा यात समावेश होता. त्याचप्रमाणे शिवकालीन खेळांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या किरण गुंजाळ या विद्यार्थ्याचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षक सावदेकर, प्राचार्य सतीश बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले, तर माजी विद्यार्थीही भूतकाळातील आठवणीत रमले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. आभार लखन सावंत यांनी मानले. यावेळी डॉ. पवन सोनवणे, उज्ज्वल खैरनार, राज सोनवणे, किशोर बागुल, संभाजी बोरसे, दिलीप भामरे, संजय बडवर, मनोज अहिरे, विजय पवार, गोकुळ अहिरे, रवींद्र गांगुर्डे, संतोष पवार, नीलकंठ कुलकर्णी, विजय चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.