वीजतारांच्या धक्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 13:25 IST2021-05-12T13:25:07+5:302021-05-12T13:25:28+5:30

खर्डे : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे चालत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील चाऱ्याला विजेच्या तारा लागल्याने चारा जळून खाक झाला.

Burn the fodder in the trolley with the shock of electric wires | वीजतारांच्या धक्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक

वीजतारांच्या धक्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक

खर्डे : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे चालत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील चाऱ्याला विजेच्या तारा लागल्याने चारा जळून खाक झाला. रामेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅकरच्या ट्रॉलीला विजेच्या तारा लागल्याने ट्रॉलीमधील संपूर्ण चारा जळून खाक झाला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिकामी ट्रॉली बाहेर काढण्यात यश आले . यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा ट्रॅक्टर चांदवड तालुक्यातील राजदीर येथील असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले . या अकस्मात घटनेत चारा जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे . घटनास्थळी रामेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन पगार,गोविंद पगार,अशोक शिपाई,किशोर पगार,विशाल पगार आदीं धावून आल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: Burn the fodder in the trolley with the shock of electric wires

टॅग्स :Nashikनाशिक