फुलेनगर येथे चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:02+5:302021-03-21T04:14:02+5:30

--------------------- शंकरराव वाजे यांना आदरांजली सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने लोकनेते स्व. शंकरराव बाळाजी वाजे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली ...

Burn the fodder at Phulenagar | फुलेनगर येथे चारा जळून खाक

फुलेनगर येथे चारा जळून खाक

Next

---------------------

शंकरराव वाजे यांना आदरांजली

सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने लोकनेते स्व. शंकरराव बाळाजी वाजे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते स्व. वाजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संदीप गुजराथी यांंनी वाचनालयाला पुस्तक भेट दिले. कार्यक्रमाला संचालक निर्मला खिंवसरा, संजय बर्वे, मनीष गुजराथी, सागर गुजर, साहील बोहरी उपस्थित होते.

-------------------

दापूर शिवारात बछड्यांचा वावर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर-दोडी मार्गावरील बेलगाय वस्तीवर बिबट्याच्या दोन बछड्यांचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांना सातत्याने त्यांचे दर्शन होत असल्याने घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धजावत नाही. नथू गेणू आव्हाड यांना रात्री या बछड्यांचे दर्शन झाले. परिसरातील शेतकऱ्यांनाही नेहमीच त्यांचे दर्शन होत असल्याने सायंकाळनंतर वस्तीवर राहणारे ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत.

------------------

देवपूर येथून दोन दुभत्या गायींची चोरी

सिन्नर : तालुक्यातील देवपूर शिवारातून मध्यरात्रीच्या सुमारास दोन जर्सी गायींची चोरी झाली. सागर तानाजी गायधनी यांनी अज्ञाताने घरासमोर बांधलेल्या गाई चोरून नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात दिली आहे. काळ्या व सफेद रंगाच्या दोन्ही गाई चांगल्या प्रमाणात दूध देत होत्या. यामुळे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

--------------------

सिन्नर तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

सिन्नर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याने तालुक्याची वाटचाल पुन्हा संकटाकडे नेणारी ठरू शकते. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

---------------

पास्तेच्या सरपंचपदी स्नेहल आव्हाड

सिन्नर : तालुक्यातील पास्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल शरद आव्हाड तर उपसरपंचपदी मनीषा प्रवीण भालेराव यांची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

Web Title: Burn the fodder at Phulenagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.