पिंपळखुटे तिसरे येथे घरफोडी, लाखोंचा ऐवज चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:22 IST2020-10-29T00:21:49+5:302020-10-29T00:22:33+5:30
येवला : तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे येथे चोरट्यांनी घरफोडी करून २ लाख २९ हजार ८५१ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

पिंपळखुटे तिसरे येथे घरफोडी, लाखोंचा ऐवज चोरीस
येवला : तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे येथे चोरट्यांनी घरफोडी करून २ लाख २९ हजार ८५१ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपळखुटे तिसरे येथील योगिता भाऊसाहेब घुगे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाज्याला रात्रीच्या सुमारास होल करून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील देव्हारा, कपाट, लोखंडी पेटी यातून सोन्या चांदीचे दागिने व ३५ हजारांची रोख रक्कम असा एकूण २ लाख २९ हजार ८५१ रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात उत्तर पूर्व भागातील ही नववी घटना असल्याने पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.