शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

माजी आमदाराच्या घरातील चोरीचा लागला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:55 PM

चांदवड : माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या शिवाजी चौकातील बंद घरातून काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा पोलिसांनी लावला आहे. या चोरी प्रकरणात लासलगाव येथून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या विशेष पथकाने संशयित रमजू भैय्यालाल पठाण (३९) याला मुद्येमालासह अटक केली आहे.

ठळक मुद्देसंशयित ताब्यात : दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चांदवड : माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या शिवाजी चौकातील बंद घरातून काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा पोलिसांनी लावला आहे. या चोरी प्रकरणात लासलगाव येथून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या विशेष पथकाने संशयित रमजू भैय्यालाल पठाण (३९) याला मुद्येमालासह अटक केली आहे. तर १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्य़ांनी लंपास केला होता. तो मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.दि. ४ जुलै रोजी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे शेतात वस्तीवर राहण्यासाठी गेल्याचा फायदा घेत त्यांच्या शिवाजी चौकातील राहत्या घरातून घराला लावलेले कुलूप तोडून घरातील मुद्देमाल चोरी गेल्याप्रकरणी राहुल शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली होती.

त्यात त्यांनी म्हटले होते की, लोखंडी कपाटातून दहा हजार रुपये रोख त्यात पाचशेच्या सोळा नोटा, शंभर रुपयांच्या २० नोटा, सहा लाख रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र, सोन्याची पोत पंधरा तोळे, तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे कानातील वेल, अंगठी, चांदीचे पायातील तीन जोड, जमीन साठेखत, मूळ कागदपत्र, सही केलेले कोरे स्टॅम्प पेकर, आयकर विभागाचे कागदपत्र, असा एकूण १० लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्येमाल या चोरट्य़ांनी लंपास केला होता.

त्यानंतर राहुल कोतवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होऊन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या विशेष पथकाने लासलगावमधून संशयित रमजू भैयालाल पठाण याला मुद्येमालासह अटक केली असून याबाबत अजूनही काही संशयित आहे काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :ThiefचोरPolice Stationपोलीस ठाणे