घरफोडीत चौदा तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:19+5:302021-09-06T04:19:19+5:30
मराठा कॉलनी येथे राहणारे फिर्यादी उत्तम धोंडू सारुक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या गुरुवारपासून सारुक्ते कुटुंबीय कामानिमित्त ...

घरफोडीत चौदा तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला
मराठा कॉलनी येथे राहणारे फिर्यादी उत्तम धोंडू सारुक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या गुरुवारपासून सारुक्ते कुटुंबीय कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली सोन्याची पोत, तीन चेन, बोरमाळ, नेकलेस, तीन नथ, कानातील वेल, अंगठ्या, असे १४ तोळ्याचे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख असा चार लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सारुक्ते कुटुंबीय शनिवारी (दि.४) पुन्हा घरी आले असता त्यांना कडीकोयंडा तुटलेला आढळल्याने घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्वरित पोलिसांना माहिती दिली असता तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपासाची चक्रे फिरविली.