विजयनगर येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:07 IST2019-02-08T15:07:42+5:302019-02-08T15:07:54+5:30
सिन्नर : येथील विजयनगर भागातील सावतामाळी मंदिरासमोरील गंगापार्वती अपार्टमेंटमधील बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला.

विजयनगर येथे घरफोडी
सिन्नर : येथील विजयनगर भागातील सावतामाळी मंदिरासमोरील गंगापार्वती अपार्टमेंटमधील बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला. नगरपरिषदेतील बबलू शेख याठिकाणी वास्तव्यास आहे. कुटुंबातील सर्वजण दिवसभर कामावर गेले होते. सायंकाळी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला. कपाटातील रोख तीस हजार रूपये, चाळीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.