जायगाव परिसरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:50 IST2018-10-28T18:50:22+5:302018-10-28T18:50:36+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव - वडझीरे रस्त्यालगत असणाऱ्या काकडमळा भागातील राजेंद्र कर्डक यांच्या शेतातील बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी पंधरा हजार रूपये किंमतीचे साहित्य लांबविल्याची घटना घडली आहे.

Burglar in Jayagaon area | जायगाव परिसरात घरफोडी

जायगाव परिसरात घरफोडी

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव - वडझीरे रस्त्यालगत असणाऱ्या काकडमळा भागातील राजेंद्र कर्डक यांच्या शेतातील बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी पंधरा हजार रूपये किंमतीचे साहित्य लांबविल्याची घटना घडली आहे.
नाशिक येथे राहणाºया कर्डक कुटुंबाचे वास्तव्य असून तेथून ते शेतीकडे ये-जा करतात. अज्ञात चोरटयांनी त्याचा फायदा घेत बंद घरातून शेतीपंप, औषध फवारणी पंप, वायर, प्लॅस्टिक कागद असे १५ हजार रूपये किंमतीचे साहित्य लांबवले. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस हवालदार लक्ष्मण बदादे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

Web Title: Burglar in Jayagaon area