करवाढीचा टळला बोजा !
By Admin | Updated: February 28, 2017 02:21 IST2017-02-28T02:21:16+5:302017-02-28T02:21:37+5:30
नाशिक : निवडणूक संपली आणि नाशिककरांवर करवाढीचे संकट उभे ठाकले खरे, परंतु मावळत्या कारकिर्दीतील स्थायी समितीच्या सदस्यांनी ही दरवाढ सपशेल फेटाळून लावत नागरिकांना दिलासा दिला आहे

करवाढीचा टळला बोजा !
नाशिक : निवडणूक संपली आणि नाशिककरांवर करवाढीचे संकट उभे ठाकले खरे, परंतु मावळत्या कारकिर्दीतील स्थायी समितीच्या सदस्यांनी ही दरवाढ सपशेल फेटाळून लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे घरपट्टी आणि पाणीपट्टीत पाच वर्षांत दुप्पट वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मागे पडला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची अखेरची बैठक सोमवारी सभापती सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी करवाढीचा बोजा टाळण्यात आला. सध्या एक हजार लिटर पाण्यासाठी महापालिकेचा दर पाच रुपये इतका आहे. पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने दरवाढ करून हे दर दहा रुपये प्रतिहजार लिटर असे करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. (प्रतिनिधी)