शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:51 IST

लोहोणेर येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : नळजोडण्या तोडण्याचा इशारा; नावे डिजिटल बोर्डवर झळकविणार

लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.थकबाकीदारांना ग्रामपंचायतीच्या वतीने लोकन्यायालयामार्फत पाच ते सहा वेळा घरपोच नोटिसा देऊनही ज्या थकबाकीदारांनी थकबाकी अद्याप भरलेली नाही अशा थकबाकीदारांनी येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास १८ फेब्रुवारीपासून संबंधितांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या खंडित करण्यात येणार असल्याचे सरपंच जयवंता बच्छाव व ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार यांनी म्हटले आहे.याबाबत ग्रामपंचायतीने दिलेली माहिती अशी की, लोहोणेर ग्रामपंचायतीची ३१ मार्च २०१९ अखेर सुमारे १३ लाख ७५ हजार ८५८ रु पये घरपट्टी व पाच लाख ५३ हजार ६१२ रुपये पाणीपट्टी थकबाकी आहे. सदरची घरपट्टी थकबाकी ही २०७ जणांकडे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून थकीत आहे, तर १७७ खातेदारांकडे एक वर्षाची थकीत बाकी येणे आहे. या थकीत येणे बाकी वसुलीसंदर्भात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत चर्चा होऊन वसुलीबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असा ठराव अर्जुन लाला शेवाळे यांनी सूचक म्हणून मांडला. त्यास माजी सरपंच अशोक अलई यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायतीमार्फत होणाऱ्या लिलावात सहभागी झालेल्या लिलावधारकाकडे ३१ मार्च २०१९ पर्यंत सुमारे १३ लाख ९३ हजार ६०० रुपये थकबाकी आहे. या थकबाकीसंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे गावात आवाहन करण्यात येणार आहे. सदर थकबाकी ग्रामपंचायतीकडे जमा न केल्यास थकबाकीदारांची नावे डिजिटल बोर्डावर झळकाविण्यात येणार आहेत. ज्या थकबाकीदाराकडे ग्रामपंचायतीची घरपट्टी, नळपट्टी अथवा जागाभाडे थकीत आहे अशा थकबाकीदारांनी येत्या १७ तारखेच्या आत आपली थकबाकी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरून द्यावी अन्यथा अशा थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून, याबाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन सरपंचांसह प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.वसाकाकडे १५ लाखांची बाकीलोहोणेर ग्रामपंचायतीच्या थकबाकीदारांमध्ये वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, वसाकाकडे १५ लाख १९ हजार २४८ रु पये मागील थकबाकी व ११ लाख ६१ हजार ३१३ रु पये चालू थकबाकी अशी एकूण २६ लाख ८० हजार ५६१ रु पये सन २०१९-२० पर्यंत थकीत रक्कम आहे, तर ग्रामपंचायतीचे ७६ हजार ७७० रु पये जागा भाडेही संबंधितांकडे थकीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत