मनपाचा बेकायदा बांधकामांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:29 IST2019-01-18T23:50:44+5:302019-01-19T00:29:01+5:30
केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सरकारवाडा पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

मनपाचा बेकायदा बांधकामांना दणका
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सरकारवाडा पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.
गंगापूररोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस मुख्यालयाच्या जागेतच सुमारे अर्धा एकर जागेवर काकडबाग ही झोपडपट्टी होती. ती हटविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने प्रयत्नही केले होते. मात्र, संबंधित झोपडपट्टीधारक हे उच्च न्यायालयात गेले होते. मात्र गेल्यावर्षी त्याचा निकाल देताना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे कळवले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी सुनावणी घेतली आणि पोलीस आयुक्तालच्या बाजूने निकाल देताना झोपडपट्टी ३० दिवसांत हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार २६ जानेवारीपर्यंत मुदत असल्याने झोपडपट्टीधारक जाण्यास तयार नव्हते. मात्र पोलीस आणि महापालिकेने त्यांना तीन दिवसांपूर्वीच झोपडपट्ट्या हटविण्याचे सूचित केले होते.
शुक्रवारी (दि.१८) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तेथे जाऊन नागरिकांना झोपडपट्ट्या हटविण्यास वेळ दिला. परंतु काहींनी विरोध केला आणि कर्मचाºयांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पंधरा जणांना ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेची मोहीम शांतेत पार पडली.