शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

भगूरच्या पाण्यासााठी मंजूर बंधारा शासनाकडून रद्द

By श्याम बागुल | Published: August 31, 2018 3:56 PM

३० वर्षांपूर्वी भगूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावी लागल्याने त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गावाला ९२-९३ साली तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्यात गावातील संपूर्ण जुनाट पाणीपुरवठा पाइपलाइन काढून नवीन मोठ्या लाइन टाकणे, नवीन टाक्या बांधणे आणि दारणा नदीकाठी कोल्हापूर टाइप बंधारा

ठळक मुद्देलष्करावरच भरवसा : भविष्यात पाण्यासाठी वणवण जायकवाडी प्रकल्पाच्या उध्व भागात नवीन प्रकल्प हाती घेण्यास मनाई

भगूर : शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाने २५ वर्षांपूर्वी तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यात सावरकर स्मारकासमोरील दारणा नदीपात्रात स्वतंत्र मंजूर केलेला बंधारा रद्द केला असून, या पाणीपुरवठा योजनेसाठी भगूर नगरपालिकेने केलेला खर्च वाया तर गेलाच, परंतु लष्कराच्या बंधाऱ्यावर अवलंबून असलेला शहराचा पाणीपुरवठा भविष्यात संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.३० वर्षांपूर्वी भगूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावी लागल्याने त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गावाला ९२-९३ साली तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्यात गावातील संपूर्ण जुनाट पाणीपुरवठा पाइपलाइन काढून नवीन मोठ्या लाइन टाकणे, नवीन टाक्या बांधणे आणि दारणा नदीकाठी कोल्हापूर टाइप बंधारा बांधणे आदी कामांचा समावेश होता. सदरची कामे शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागाने गावातील पाणीपुरवठ्याची सर्वच कामे केली मात्र बंधारा बाधला नाही. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कालांतराने बंधा-याच्या बांधकामाची किंमत वाढली. त्यामुळे बंधाºयाचा प्रश्न बाजूला पडला. उलट प्रस्तावित बंधा-याच्या बाजुलाच लष्करी बंधा-यातून मुबलक पाणी मिळत असल्याने भगूरसाठी स्वतंत्र बंधा-याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. सध्या लष्करी बंधा-यातून भगूर नगरपालिकेला पाणी मिळत आहे, परंतु लष्कराने पाणी उचलू देण्यास नकार दिल्यास भगूरवर पाणी संकट कोसळण्याची भीती आहे. या संदर्भात भाजपा शहराध्यक्ष प्रसाद अंबादास आडके यांनी भगूर बंधारा कधी बाधणार याबाबतचे निवेदन शासनाला दिले असता, त्यावर जलसंपदा विभागाने पत्राद्वारे उत्तर देताना नमूद केले की, जायकवाडी प्रकल्पाच्या उध्व भागात नवीन प्रकल्प हाती घेण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळील दारणानदीवर नव्याने स्वतंत्र बंधारा बांधता येणार नाही असे कळवून सदर बंधाºयाची मान्यता रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे.चौकट==

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक