शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातुन बैलगाडी ऊस वाहतूक नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:58 IST

लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.

ठळक मुद्देलखमापूर : यंत्रिकी साधनांचा मोठ्या प्रमाणांवर वाहतुकीसाठी होतोय उपयोग

लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.सध्याचे युग गतिमान झाल्यामुळें प्रत्येक ठिकाणी कमी वेळेत जास्त काम कसे होईल. यावर जास्त प्रमाणात भर असते. अशाच एका प्रकारात वेळेची बचत करण्यासाठी चालु स्थितीतील साखर कारखान्यांनी वेळेची बचत व ऊस वाहतूक लवकरात लवकर कशी होईल. तसेच कोणत्याही शेतकरी वर्गाचा ऊस शेतात जास्त दिवस उभा राहू नये,यासाठी ट्रक, टँक्कटर आदी वाहनांच्या सहाय्याने ऊस वाहतूक केली जाते.पुर्वी ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता. तेव्हा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. बैलगाडी ऊस वाहतूक साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आत राहायची. त्यासाठी बैलगाडी ऊस ट्रेंडर काढुन ते ऊस वाहतुकीला दिले जात होते.परंतु आता बाहेरील ऊस पुरवठा क्षेत्र वाढल्याने जास्त किलोमीटर वरुन बैलगाडी वाहतूक करू शकत नाही. म्हणून लांब पल्ल्याची ऊस वाहतूक शेवटी साखर कारखान्यांना आधुनिकरणाकडे वळून यांत्रिकी साधनांचा उपयोग करावा लागला. त्यामुळे बैलगाडी वाहतूकीचे कमी प्रमाण झाले.आता बाजारपेठेत बैल जोडी खरेदी करण्यासाठी मोठे भांडवल लागते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. सध्या काही कारखाने बंद असल्याने पुर्वी चे काही बिले बंद पडलेल्या साखर कारखान्याकडे आटकलेल्या असल्याने काही अंशी आता उसतोड कामगार या कामांकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे पुर्वी ज्या साखर कारखान्याकडे उदा. १०० बैलगाडी ऊसवाहतुकीसाठी असायच्या त्या कारखान्याकडे आता ऊस वाहतुकीसाठी फक्त ३० ते ३५ बैलगाडी उपलब्ध आहे. त्याच्या आता ट्रक, ट्रॅक्टर, यांत्रिकी ऊस तोड मशीन यामुळे वेळेची बचत व ऊस लवकर तोडला जातो. व कमी वेळेत कारखाना स्थळांवर लवकर जातो. या गोष्टीमुळे सध्या बैलगाडीवरील ऊसवाहतुक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.१) पुर्वी ग्रामीण भागातून ऊसांची भरलेले बैलगाडी रस्त्याने चालली तर लहान मुले ऊस ओढण्यासाठी एकच गर्दी करायचे व बैलगाडीतून ऊस ओढायचे परंतु आता हे चित्र दिसत नाही.२) खडतर परिश्रम, रस्त्याची खराबी, बैलगाडी खरेदीसाठी भांडवलाचा तुटवडा, यामुळे या व्यवसायाला काहींनी राम राम ठोकला आहे. (२४ लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने