बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:23 IST2018-06-08T01:23:54+5:302018-06-08T01:23:54+5:30

पंचवटी : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये बुधवारी (दि.७) रात्री जेवणानंतर बाकावर बसून मित्रासमवेत गप्पा मारणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत वाद घालून थेट डोक्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नितीन परदेशी नामक युवक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 Bullets shot at Boragarh | बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या

बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या

ठळक मुद्दे हल्लेखोर फरार : एकतानगर हादरले

पंचवटी : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये बुधवारी (दि.७) रात्री जेवणानंतर बाकावर बसून मित्रासमवेत गप्पा मारणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत वाद घालून थेट डोक्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नितीन परदेशी नामक युवक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ एकतानगर येथे राहणारा नितीन परदेशी हा बुधवारी (दि.६) रात्री साडेदहा वाजता परिसरातील साती आसरा मंदिराजवळ लोखंडी बाकावर मित्रासमवेत बसलेला होता.

Web Title:  Bullets shot at Boragarh

टॅग्स :Crimeगुन्हा