बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:54 IST2021-02-16T00:54:15+5:302021-02-16T00:54:38+5:30

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाला.

A bull is killed in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

ठळक मुद्देरात्री दहाच्या सुमारास बिबट्याने गोऱ्हावर हल्ला केला.

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाला.

चांदोरीपासून पुढे काही अंतरावर असलेल्या शिंपी टाकळी फाट्याजवळ शिवाजी परशराम शिंदे हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराच्याबाहेर जनावरे बांधलेली होती. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक बिबट्याने गाईच्या गोऱ्हावर हल्ला केला. यावेळी झालेल्या जनावरांच्या आरडाओरडीने शिंदे कुटुंबीय तातडीने घराबाहेर आल्याने बिबट्या पसार झाला; मात्र या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाला. ही घटना वन विभागाला कळवण्यात आली.

Web Title: A bull is killed in a leopard attack