शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमरधाम प्रवेशद्वारावरच बांधली तिरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:28 IST

पिंपळगाव बसवंतजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सात जणांच्या मृतदेहावर रात्री नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले

नाशिक : पिंपळगाव बसवंतजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सात जणांच्या मृतदेहावर रात्री नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व मृतदेह अमरधामच्या प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आले होते. वेळेअभावी या प्रवेशद्वारासमोरच तिरडी बांधण्यात येत होती. एका रांगेत ठेवलेले मृतदेह पाहून मृतांच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडला.पिंपळगावच्या ग्रामीण  रुग्णालयात गर्दी झाल्याने राज्य शासनाच्या रुग्णवाहिकेने (१०८) मृतदेह हलविण्यात आले. सायंकाळी उशीर झाल्याने अंत्यसंस्कारासाठी सर्व मृतदेह नाशिक अमरधाम येथे आणण्यात आले. स्मशानभूमीच्या रस्त्यावर चार-पाच रु ग्णवाहिका तर प्रवेशद्वाराजवळ सर्व मृतदेह रांगेत ठेवलेले हे दृश्य पाहून नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. मृतांमध्ये कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची मुलगी, तर कुणाचे वडील होते. त्यात सहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एकाचवेळी एवढ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग आयुष्यात येईल, असे स्वप्नातही नातेवाइकांना वाटले नसावे.उपस्थित अनेकांनी मृतांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते अग्निडागापर्यंतच्या अनेक कामांसाठी परिसरातील तरु णांनी सरसावले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर घडलेली दुर्घटना अनेकांचे संसार होत्याचे नव्हते करून गेली.मृतदेह आणले अमरधाममध्येअपघातात मरण पावलेले सातही मृतदेह थेट नाशिक अमरधाम येथे आणण्यात आले. सकाळी देवकार्यासाठी निघालेल्या या दुर्दैवी कुटुंबीयांना त्यांचे मृतदेह घरीसुद्धा नेता आले नाही. सकाळी घराबाहेर पडलेला त्यांचा प्रवास अखेरचाच ठरला. अमरधामच्या प्रवेशद्वाराजवळच अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करून गोदातीरी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू